धक्कादायक : जम्मू-काश्मीरच्या माजोरड्या 'डीआयजी'चं पितळ उघडं!

जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका उप महानिरीक्षक (डीआयजी)च्या मुलानं आपल्या वडिलांचे आणि आपल्या ‘लॅव्हिश’ आयुष्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत... आणि याच फोटोंमुळे सध्या डीआयजीच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावर पर्दाफाशही झालाय. 

Updated: Oct 30, 2014, 08:55 AM IST
धक्कादायक : जम्मू-काश्मीरच्या माजोरड्या 'डीआयजी'चं पितळ उघडं!  title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर पोलिसांच्या उप महानिरीक्षक (डीआयजी)च्या मुलानं आपल्या वडिलांचे आणि आपल्या ‘लॅव्हिश’ आयुष्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत... आणि याच फोटोंमुळे सध्या डीआयजीच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावर पर्दाफाशही झालाय. 

जम्मू काश्मीरचे डीआयजी शकील बेग हे स्वत: आपले बूट चढवत नाहीत तर एक पोलीस त्यांना बूट चढवतो. हा फोटो शकील यांचा मुलगा टोनी बेग यानं सोशल वेबसाईट इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये, टोनीनं लिहिलंय ‘माझे वडील, असली बादशाह! गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांनी कधीही स्वत: स्वत:चे बूट चढवलेले नाहीत’.

दुसऱ्या एका फोटोत डीआयजी शकील बेग आणि त्यांचा मुलगा बिल्डिंगमधून बाहेर येताना दिसतोय... आण एका पोलीस अधिकाऱ्यानं त्यांच्या डोक्यावर छत्री धरलीय. या फोटोवर टोनीनं लिहिलंय ‘पाऊस किंवा ऊन असो वा नसो माझ्या वडिलांसाठी नेहमीच छत्री, सुरक्षा आणि बंदुका तयार असतात’.
आणखी एक फोटो शेअर करत टोनीनं सोशल वेबसाईटवर म्हटलंय ‘माझे वडील जेव्हा रोडवर निघतात तेव्हा पोलीसवाले असे ट्राफीक क्लिअर करतात’

धक्कादायक म्हणजे, याच वर्षी शकील बेग यांना राष्ट्रपतींकडून गोल्ड मेडल मिळालाय. मीडियासमोर ही गोष्ट आल्यानंतर लगेचच टोनीनं हे फोटो इन्स्टाग्रामवरून हटवलेत... त्यानंतर आणखी एक फोटो पोस्ट करून लिहिलंय ‘दरवर्षीप्रमाणे कुटुंबीयांसोबत केवळ ३-४ दिवस घालवले आणि मीडियानं त्याला या पद्धतीनं दाखवलं. मी आता भारताशी कोणताही संबंध ठेवत नाही... तिथले लोक स्वयंभू व्यक्तीत्वाचे वगैरे नाहीत. किंगलाईफ ३६५ दिवस चालते, फक्त ३-४ दिवसांसाठी नाही’. 

या फोटोंवर सोशल मीडियातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत... वरुण गांधींनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

या फोटोंवर सोशल मीडियातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत...

वरुण गांधी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.