शाळेच्या बाथरूममध्ये विद्यार्थीनीने बाळाला दिला होता जन्म, आरोपी अटकेत

माधेपूर येथील नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी माधेपूर येथील शाळेमधीळ वॉशरूममध्ये या मुलीने एका बाळाला जन्म दिला होता. 

Updated: Jan 5, 2016, 02:30 PM IST
शाळेच्या बाथरूममध्ये विद्यार्थीनीने बाळाला दिला होता जन्म, आरोपी अटकेत  title=

हैदराबाद : माधेपूर येथील नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी माधेपूर येथील शाळेमधीळ वॉशरूममध्ये या मुलीने एका बाळाला जन्म दिला होता. 

दिलीप सरकार असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकताचा आहे. या गावात तो एक हॉटेल चालवत आहे. या आरोपीने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

 आरोपीच्या म्हणण्यानुसार शारीरिक संबंध निर्माण करण्यासाठी मी मुलीला पैसै दिले होते, असे पोलिसांनी सांगितले. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या मुलीने शालेच्या वॉशरूममध्ये एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 

ही घटना घडल्यानंतर दिलीप पश्चिम बंगालला पळून गेला होता. चौकशी दरम्यान त्याचे नाव समोर आले. त्याला काल रात्री अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.