गोव्यात मान्सून सक्रीय, रिमझिम सुरुच

गोव्यात  मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय. 

Updated: Jun 12, 2015, 09:56 AM IST
गोव्यात मान्सून सक्रीय, रिमझिम सुरुच title=

पणजी : गोव्यात  मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय. 

हा  पाऊस  शेतीच्या कामासाठी योग्य आणि गरजेचा असल्यानं, शेतकरी वर्गाकडून  समाधान व्यक्त होत आहे. गोव्यात आतापर्यंत १६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, येत्या चोवीस तासांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.

तर समुद्रातल्या वाऱ्याचा वेग वाढल्यानं खवळलेल्या समु्द्रात जाऊ नये, असा इशाराही गोवा वेधशाळेने दिलाय. तर महाराष्ट्र राज्याला मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा दिलाय. तर अशोबा वादळ ओमानला पोहोचण्याची शक्यता असल्यानं, अरबी समुद्रातली वा-याची स्थिती पूर्ववत होईल, अशी आशा हवामानतज्ज्ञ बाळगून आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.