हिंदू जागा होत आहे, घाबरण्याची गरज नाही - सरसंघचालक

हिंदू जागा होतोय आता घाबरण्याचं कारण नाही, अशी गर्जना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी धर्मांतर बंदी कायद्याला पाठींबा द्या, आव्हान मोहन भागवत यांनी दिले.

Updated: Dec 20, 2014, 07:47 PM IST
हिंदू जागा होत आहे, घाबरण्याची गरज नाही - सरसंघचालक title=

लखनऊ : हिंदू जागा होतोय आता घाबरण्याचं कारण नाही, अशी गर्जना सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी धर्मांतर बंदी कायद्याला पाठींबा द्या, आव्हान मोहन भागवत यांनी दिले.

हिंदू जागा होत आहे, आता घाबरण्याची गरज नाही. रस्ता भरकटलेल्यांना परत आणण्याची गरज. हिंदू धर्मासाठी कोणावरही दबाव नाही. हिंदू कोणावरही जबरदस्ती करायला गेला नव्हता. पण जे कोणी धर्मातून बाहेर पडलेत, जे वाट चुकलेत त्यांना परत आणणार असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आग्र्यात झालेल्या धर्मांतराच्या प्रकाराला एकप्रकारे पाठींबाच दिलाय.

धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी आधी धर्मांतर बंदी कायद्याला पाठींबा द्या, असं आव्हान मोहन भागवतांनी दिलं. सक्तीच्या धर्मांतराला भाजपने विरोध केलाय. आमचे देशातील सर्व पक्षांना आवाहन आहे की त्यांनी धर्मनिरपेक्षतेसाठी आवश्यक असलेल्या विधेयकाला पाठिंबा द्यावा असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलंय.

कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना शाह यांनी देशभरात सुरु असलेल्या सक्तीच्या धर्मांतराबाबत पक्षाचं मत व्यक्त केलं. सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा बनवण्याचा सरकारचा मानस असून राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मांतराला विरोध करण्यापूर्वी धर्मांतर बंदीच्या कायद्याला पाठिंबा द्या असं आवाहन केलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.