म्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब

भारतामध्ये गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते. 

Updated: Aug 1, 2016, 04:31 PM IST
म्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब title=

मुंबई : भारतामध्ये गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते. न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्याकडे असलेली पेनाची निब तोडून टाकतात. ज्या पेनानं फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होतं, त्याच पेनाची निब न्यायाधीश तोडतात. पेनाची निब तोडण्यामागे काही कारणं असल्याचं बोललं जातं. 

ज्या पेनानं दोषीच्या फाशीवर मोहोर लावली जाते, त्या पेनाचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून पेनाची निब तोडली जाते. 

कोणतीही व्यक्ती एवढा गंभीर अपराध करू नये यासाठी पेनाची निब तोडणं हे एक प्रतिकात्मक कृत्य मानलं जातं. 

जेव्हा या पेनानं फाशी लिहीलं जातं, तेव्हा दोषीबरोबर पेनही संपवण्यासाठी पेनाची निब तोडतात, असा समज आहे.