भूतांपासून वाचण्यासाठी त्यानं कतरिनाशी केलं लग्न!

ऐकायला थोडं विचित्र वाटेल... पण, ही घटना एका व्यक्तीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलीय. एका व्यक्तीनं भूतांपासून दूर राहण्यासाठी हिंदू धर्माच्या रीतींप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यासोबत विवाह केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 2, 2014, 04:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
ऐकायला थोडं विचित्र वाटेल... पण, ही घटना एका व्यक्तीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडलीय. एका व्यक्तीनं भूतांपासून दूर राहण्यासाठी हिंदू धर्माच्या रीतींप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यासोबत विवाह केलाय. ही घटना छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील जलामपूर गावात घडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील लोकांनी नंद कुमार देवनगन याच्या डोक्यात भरवलं की, हिंदू चालीरीतीनं त्यानं कुणासोबत लग्न केलं नाही तर भूत त्याला त्रास देतील आणि मग आयुष्यभर त्याला भूतांच्या त्रासाखालीच जीवन जगावं लागेल. देवनगन यानं यापूर्वीच तीन लग्नही केली आहेत.
या भागातील परंपरेनुसार, जर एखादी मुलगी विवाहीत असेल आणि तरी तिला कुणी बांगडी-कडा घातला तर त्या दोघांना पती-पत्नी मानण्यात येतं. म्हणजेच, यामध्ये लग्नात ना हळदीची परंपरा आहे ना सप्तपदीची... नंदनं याआधीची तीन लग्न अशाच पद्धतीनं केली होती.
लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेऊन त्यानं ‘कटरी’सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिंदू चाली-रितींप्रमाणे त्यानं ‘कटरी’सोबतच लग्नही लावलं. देवनगन हा अभिनेत्री कतरीना कैफ हिचा खूप मोठा फॅन असल्याचा दावा करतो. यामुळेच त्यानं आपल्या पत्नीचं ‘कटरी’चं नाव बदलून कतरीना कैफ ठेवलंय.
40 वर्षांपूर्वी याच व्यक्तीनं बसाना नावाच्या एका महिलेसोबत लग्न केलं होतं. बसाना हिचा काही वर्षांनंतर मृत्यू झाला तेव्हा त्यानं बाई नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. त्यानंतर तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर या व्यक्तीनं कुमारी नावाच्या महिलेसोबत विवाह केला आणि आता त्याची चौथी पत्नी आहे कतरीना कैफ...
नंदचं चौथं लग्नही मोठ्या थाटामाटात पार पडलं. बॅन्डबाजासोबतच अनेक तासांपर्यंत संगीतही सुरू होतं. देवगन याची तिसरी पत्नी आणि तिची दोन मुलंही या लग्नात उपस्थित होते... आणि देवगन आता असं समजतोय की त्यानं खऱ्याखुऱ्या कतरीनाशीच विवाह केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.