दिल्लीत आणखी एक गँगरेप

दिल्लीत आणखी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित महिला मुळची जयपूरची असल्याच सांगण्यात येत आहे.

Updated: Dec 27, 2012, 03:00 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत आणखी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित महिला मुळची जयपूरची असल्याच सांगण्यात येत आहे. ही महिला मथुरेहून दिल्लीला येत होती. रस्त्यात तिला कारमध्ये एका व्यक्तीनं लिफ्ट दिली.
त्यानंतर तिला फूस लावून त्यानं त्याच्या घरी नेलं, तिथं अगोदरच दोनजण थांबले होते. त्या तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला दिल्लीच्या कालकाजी भागात फेकून देण्यात आलं.

पीडित महिलेनं या प्रकरणी दिल्लीच्या कालकाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस तिघा फरार आरोपींचा शोध घेत आहेत. काल रात्री उशिरा या महिलेची एम्स रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.