अखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली!

विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.

Updated: Apr 7, 2017, 03:39 PM IST
अखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली! title=

मुंबई : विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.

'एएनआय'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांनी खेद व्यक्त केल्यानंतर 'एअर इंडिया'नं त्यांच्यावरील बंदी उठवलीय. 

६ एप्रिल रोजी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात गायकवाड यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केलाय, असं एअर इंडियानं म्हटलंय.  

या अगोदर 'ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन'नं रवींद्र गायकवाड यांच्यावरची बंदी बिनशर्त माफी मागितल्यानंतरच हटवण्यात येईल, अशी भूमिका घेतली होती. गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली तर कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं, असंही त्यांचं म्हणणं होतं.