हजारों जवाबोंसे अच्छी मेरी खामोशी- पंतप्रधान

आज लोकसभेत निवेदनाला सुरूवात करतानाच ‘कॅगचे निष्कर्ष अयोग्य असून माझ्यावर होणारे आरोप निराधार आहेत’ असा पवित्रा पंतप्रधानांनी घेतला. माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत दिलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 27, 2012, 01:02 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आज लोकसभेत निवेदनाला सुरूवात करतानाच ‘कॅगचे निष्कर्ष अयोग्य असून माझ्यावर होणारे आरोप निराधार आहेत’ असा पवित्रा पंतप्रधानांनी घेतला. माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत दिलं. कोळसा खाण घोटाळाच्या मुद्यावरुन आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज बारापर्यंत तहकूब करण्यात आलं. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन सलग चार दिवस संसद ठप्प झाली होती.
दरम्यान, संसदेत आज पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एनडीएची बैठक झाली. त्यात पंतप्रधांना बोलू द्यावं, अशी भूमिका जेडीयू आणि अकाली दलानं घेतली. तर भाजपचा आक्रमक पवित्रा कायम आहे. पंतप्रधानांना बोलू न देण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र आमच्या फूट पडली नसून एनडीएत एकजूट आहे, असं जेडीयूचे नेते शरद यादव यांनी सांगितलंय.
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यानं पाच दिवस संसदेत कामकाज ठप्प झालं. चर्चा नको पंतप्रधानांचा राजीनामा हवा अशी भूमिका विरोधकांनी कायम ठेवलीये. कॅगनं कोळसा खाण वाटपात एक लाख 86 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं अहवालात नमूद केलंय. त्यामुळं विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलंय.