भाजप अध्यक्ष अमित शहांच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज आपल्या ‘ड्रीम टीम’ची घोषणा केलीय. 

Updated: Aug 16, 2014, 01:30 PM IST
भाजप अध्यक्ष अमित शहांच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज आपल्या ‘ड्रीम टीम’ची घोषणा केलीय. 

या नव्या टीममुळे पक्षात ‘कुठे हसू तर कुठे आसू’ अशी परिस्थिती दिसतेय. नव्या टीममधून भाजपातून गांधी कुटुंबाचा वारस असलेल्या वरूण गांधी यांना महासचिव पदावरून हटविण्यात आलंय. नव्या दमाच्या तरुणांना यामध्ये स्थान दिल्याचं दिसतंय. यातील बहुतेक सदस्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे. 

या टीममध्ये महाराष्ट्रातल्या चार नेत्यांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये, विनय सहस्त्रबुद्धे (उपाध्यक्ष), श्याम जाजू (सचिव), पूनम महाजन (सचिव), विजया राहतार (मोर्चा अध्यक्ष) महत्त्वाचं म्हणजे, दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि महाराष्ट्राच्या खासदार पूनम महाजन यांच्याकडे सचिवपद देण्यात आलंय.   

जे पी नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडेय, रामलाल, भूपेंद्र यादव आणि आर एस कठेरिया यांना महासचिव बनवण्यात आलंय. 

प्रभात झा आणि बी एस येडियुरप्पा यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनविण्यात आलंय. श्रीकांत शर्मा यांना पक्षात राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्ती करण्यात आलीय. 

शाहनवाज हुसैन यांना बढती मिळालीय. हुसैन यांना भाजप प्रवक्त्यांच्या श्रेणीत क्रमांक-1 चा दर्जा दिला गेलाय. तर सुधांशु त्रिवेदी यांना दुसऱ्या क्रमांकाचा प्रवक्ता बनवण्यात आलंय.  

भाजपच्या राष्ट्रीय टीममध्ये 13 उपाध्यक्ष, 9 महासचिव, 15 सचिव आणि एक कोषाध्यक्ष असतो. यातील 13 पदं महिलांसाठी, 3 अनुसूचित जातींसाठी राखीव असतात.   

अमित शहांची 'ड्रीम टीम'

उपाध्यक्ष - बंदारू दत्तात्रय, बी. एस. येडियुरप्पा, सत्पाल मलिक, मुख्तार अब्बास नक्वी, पी. रुप्पाला, प्रभात झा, रघुवीर दास, किरण महेश्वरी, रेणू देवी आणि दिनेश शर्मा 

महासचिव - जे. पी. नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडे, भूपेंद्र यादव, आर एस कटेरिया आणि राम लाल

प्रवक्ते - शाहनवाझ हुसैन, सुधांशू त्रिवेदी, मिनाक्षी लेखी, संबीत पत्रा, एम. जे. अकबर, नलिन कोहली, बी. एस. शास्त्री, जी. व्ही. एल. एन. राव, अनिल बालुनी आणि एल कुमारमंगलम

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.