अमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी घोषणा केली.

Updated: Jul 9, 2014, 12:56 PM IST
अमित शाह भाजपचे नवे अध्यक्ष  title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी घोषणा केली.

मोदी यांच्या खास जवळचे आणि भाजपचे महासचिव शाह यांच्याकडे भाजपची सूत्रे देण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शाह हे नव्याने भाजपचे अध्यक्ष होण्याची शक्यता होती. आज अनौपचारीकपणे शाह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

आज बुधवारी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राजनाथ सिंग यांनी निवडीची घोषणा केली. अमित शाह यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पेढा भरवून अभिनंदन केले.

नरेंद्र मोदी यांचे जवळेच आणि विश्वासू शाह यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले यश मिळवून दिले. यामध्ये शाह यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंग यांना केंद्रात महत्वाचे मंत्रीपद देण्यात आल्याने त्यांची जागा शाह यांना सोपविण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.