शहीदांहूनही आम्ही करतोय मोठं काम - अमित शाह

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'शहीदांपेक्षाही आम्ही मोठं काम करतोय' असं म्हणणं आहे अमित शाहांचं.. 

Updated: Apr 6, 2015, 06:36 PM IST
शहीदांहूनही आम्ही करतोय मोठं काम - अमित शाह title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज दिल्लीमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'शहीदांपेक्षाही आम्ही मोठं काम करतोय' असं म्हणणं आहे अमित शाहांचं.. 

देशासाठी प्राण देण्यापेक्षाही आम्ही खूप मोठं काम करतोय... असंही शाह म्हणतायत. क्रांतिकारी भगत सिंग यांचा उल्लेख करत शाह म्हणतायत.... 'भगत सिंगांनी देशासाठी शहीद होणं पसंत केलं होतं... पण, आम्ही देशासाठी जगतोय'

भाजपला ३५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. 

मात्र, या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मात्र टाळलंय त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.