पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे अमित शहांना 'झेड प्लस' सुरक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळचे असलेले भाजप महासचिव अमित शहा यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे.  

Updated: Jul 3, 2014, 02:01 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे अमित शहांना 'झेड प्लस' सुरक्षा  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळचे असलेले भाजप महासचिव अमित शहा यांना 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे.  

गृह मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, धोक्याच्या दृष्टीनं सुरक्षेच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आलाय. याआधी अमित शहा लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान महत्त्वपूर्ण असे रणनीतिकार होते. तसेच आता पक्षाचे पुढील अध्यक्ष म्हणूनही त्यांचे नाव सगळ्याच्या आधी घेतलं जातंय. 

आता त्यांच्या संरक्षणांसाठी कमीत कमी ४० सुरक्षारक्षक ठेवण्यात येतील. धोक्याची पातळी लक्षात घेऊन सुरक्षारक्षकांची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे. 

आता नेहमी त्यांच्या आजूबाजूला एमपी-५ बंदूक घेऊन असलेले एनएसजी सैनिक असतील. त्यांच्या घरीही सशस्त्र घेऊन सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील. देशात ते कोठेही गेले तरी, त्यांना उच्च श्रेणीची सुरक्षा दिली जाईल. आतापर्यंत अमित शहा गुजरात पोलिसांच्या सुरक्षेमध्ये होते. 

या आधी अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळचे मानले जाते. २०१०मध्ये सोहराबुद्दीन फेक एनकाऊंटरमध्ये त्यांना अटक केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.