दिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!

दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.

| Updated: Mar 12, 2014, 03:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
मात्र तरीही तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रॅलीला उपस्थिती लावली आणि जोरदार भाषणही केले. यावेळी त्यांनी ही रॅली आपली नसून अण्णांची असल्याचं सांगत अण्णांच्या सूचनेवरूनच आपण रॅलीचं आयोजन केल्याचं सांगत रॅलीच्या अपयशाबाबत हात झटकले.
मी दिलेलं वचन पाळते असं सांगत ममतांनी अण्णांना टोलाही लगावलाय. रॅलीच्या अपयशावरून तुतू-मैंमैं होण्याची शक्यता असली तरी रिकाम्या खूर्च्या पाहून अण्णांची प्रकृती बिघडली का? असा सवाल आता करण्यात येतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.