पहिल्या दिवशी शौर्य पुरस्कार, दुसऱ्या दिवशी वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल एम एम राय हे शहीद झाले आहेत. कर्नल राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदकानं गौरवण्यात आलं होतं पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. 

Updated: Jan 28, 2015, 11:33 AM IST
पहिल्या दिवशी शौर्य पुरस्कार, दुसऱ्या दिवशी वीरमरण title=

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल एम एम राय हे शहीद झाले आहेत. कर्नल राय यांना प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा पदकानं गौरवण्यात आलं होतं पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. 
 
पोलिसांना माहिती मिळाली होती की, हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी एका घरात लपले आहेत. पोलिसांनी राष्ट्रीय रायफल्सच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली आणि त्यानंतर अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली. त्यातच युद्ध सेवा पदक विजेते कर्नल एम एन राय शहीद झाले.

दहशतवाद्यांशी झालेल्या या चकमकीत एम एम राय यांच्यासह पोलिस दलाचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले. तसेच घरात लपून बसलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.
 
एम एम राय यांना प्रजासत्ताक दिनाला युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. राय हे ४२ राष्ट्रीय रायफलच्या एका तुकडीचे कमांडिंग ऑफिसर होते.  एम एम राय काल 
दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा पथकाचे नेतृत्त्व करत होते. जवानांनी घराला घेराव घालून अखेर लपलेल्या आदिल खान आणि शिराझ दार या दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं.
 
लष्कराच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, कर्नल राय यांना दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहीमेची योजना तयार करणं आणि ती पूर्णत्वास नेणं, यासाठी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित केलं होतं. मागील वर्षी दक्षिण काश्मिरमध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये राय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
कर्नल राय उत्तर प्रदेशच्या गाजीपूरचे रहिवासी होते. ते ९ गोरखा रायफल्समध्ये कार्यरत होते. पण त्यानंतर त्यांची राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.