गुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश

पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

PTI | Updated: Aug 26, 2015, 05:52 PM IST
गुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश title=

अहमदाबाद : पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्येही हिंसेचे लोण पसरले असून, शहरातील नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेय. बापूनगर भागात बुधवारी सकाळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. वाढत्या कारवाया रोखण्यासाठी राज्यात निमलष्करी दलाचे पाच हजार जवान तैनात करण्यात आलेत. अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. 

अधिक वाचा - हार्दिक पटेल दुसरे अरविंद केजरीवाल?

निकोल परिसरात सरकारी सेवा केंद्राची जाळपोळ, सात लाख रुपयांची रोख रक्कम जळाली आणि सर्व कादपत्रे जळाली तर अहमदाबादच्या चांदलोडिया परिसरात आंदोलकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक तोडून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही अंदोलनकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला.

सूरत, वडोदरा, हमदाबाद, मेहसाना, पोरबंदर या जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे शाळा, कॉलेजला सुटी देण्यात आली आहे. तर अहमदाबादमध्ये १३ वर्षांनंतर नऊ भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अधिक वाचा : हा २२ वर्षांचा मुलगा मोदींना चॅलेन्ज करतोय....!

आरक्षण नाही तर गुजरातमध्ये कमळदेखील नाही, असा इशाराच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे रॅलीमध्ये बोलताना दिला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केलेय.हिंसेतून कोणाचंही भल होत नाही, असं मोदी यांनी म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.