हर्षिता केजरीवालनं वडिलांच्या पायावर टाकलं पाऊल...

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. 12 वीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळवल्यानंतर हर्षिताने आयआयटी जेईई ही परीक्षा पास झाली आहे.

Updated: Jun 21, 2014, 02:47 PM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था,नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालताना दिसतेय. बारावीच्या परीक्षेत चांगले टक्के मिळवल्यानंतर हर्षिताने 'आयआयटी जेईई' परीक्षा उत्तम गुणांनी पास केलीय.
बोर्डच्या परीक्षेमध्ये 96% टक्क्यांनी पास झाल्यावर हर्षिताने देशातल्या इंजिनियरिंगच्या सर्वांत कठिण असलेल्या आयआयटी जेईई परीक्षेत देशातून 3322 वा क्रमांक मिळवलाय.
हर्षदाचे वडील म्हणजेच अरविंद केजरीवाल यांनीदेखील आयआयटीमधूनच आपले शिक्षण पूर्ण केलंय. त्यांनी आपली इंजिनिअरिंगची पदवी आयआयटी खडकपूरला पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी आयएफएसची परीक्षेतही यश मिळवलं होतं.
अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुल्कित यानेही बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवलेत. या दोन्ही मुलांसाठी असं यश मिळवणं सोपं तितकं सोपं नव्हतं... कारण, जेव्हा ही मुलं या यशासाठी प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्या वडिलांच्या राजकीय आणि खाजगी जीवनात मोठी उलथा-पालथ झाली होती. हर्षिताने ज्यावेळी आयआयटी परीक्षा दिली त्यावेळी नितीन गडकरी यांच्या बदनामी प्रकरणात केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.