जामीनासाठी आसाराम बापूंची हायकोर्टाकडे धाव!

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, September 5, 2013 - 11:04

www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम बापू जामीनासाठी आता हायकोर्टात घेणार आहेत. जोधपूर कोर्टानं काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. आता उद्या ते हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
आसाराम बापूंना जामीन मिळाल्यास तपासावर त्याचा परिणाम होईल, असं सरकारी पक्षानं कोर्टात म्हटल्यानंतर बापूंना जामीन अर्ज फेटाळण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी दोन दिवस आसाराम बापूंच्या वकिलांचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर हा निर्णय दिला.
प्राथमिक माहिती अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि संबंधित मुलीनं दिलेला जबाब यांतील माहितीबाबत आसारामबापू यांचे वकील के. के. मेनन यांनी आक्षेप उपस्थित केले होते. मात्र, त्यांचं म्हणणं न्यायाधीशांनी फेटाळलं. संबंधित मुलगी अल्पवयीन नाही, त्यामुळं "प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्शु अल ऑफेन्सेस ऍक्ट `नुसार गुन्हा दाखल करता येणार नाही, असाही युक्तिवाद मेनन यांनी केला, मात्र तोही फेटाळण्यात आला.
७२ वर्षीय आसाराम बापूंना शनिवारी मध्यरात्री इंदूर इथल्या आश्रमातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013 - 11:04
comments powered by Disqus