सेवकानं केली आसाराम बापूची पोलखोल!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, September 4, 2013 - 11:25

www.24taas.com, झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आता आसाराम बापूच्या सेवकानचं आसाराम बापूंची पोलखोल केलीय.
आसाराम बापूचा सेवक म्हणून काम करत असलेल्या शिवा यानं आसाराम बापूच्या अनेक गोष्टी उघड केल्यात. शिवानं दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापू महिलांना अनेकदा एकांतात भेटण्यासाठी भाग पाडत असे. तसंच आसाराम बापूला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचेही फोन येत होते.
ज्या मुलीच्या वडिलांनी आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केलाय त्या पीडित मुलीलादेखील भूत-प्रेत पळवण्याचा दावा करून १४ ऑगस्ट रोजी बोलावण्यात आलं होतं. आसाराम बापूलाही याची कल्पना होती, असं शिवानं म्हटलंय.

मंगळवारी, आसाराम बापूला कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी जामीन अर्जावर सुरू झालेली सुनावणी जवळजवळ दोन तास सुरू होती. सुनावणी दरम्यान आसाराम बापुचे वकील के के मनन यांनी त्यांची बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाचं कामकाज स्थगित करण्यात आलं. आज याचिकाकर्त्यांचे वकील कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013 - 11:25
comments powered by Disqus