अश्लील सीडी बनवून `बापू` करायचे ब्लॅकमेल?

By Jaywant Patil | Last Updated: Friday, September 6, 2013 - 18:44

www.24taas.com, झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सध्या अटक झालेले आध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्याबद्दल नवीन खुलासा झाला आहे. आसाराम बापू आपल्या महिला भक्तांची अश्लील सीडी बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्य़ात येत आहे.
आसाराम बापू यांच्या गुप्त सीडीबद्दल त्यांच्याच आश्रमातील शिवाने माहिती दिली आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या शिवाने आश्रमामधील अनेक अश्लाघ्य घटनांबद्दल माहिती दिली आहे. सीडी मिळेपर्यंत शिवा पोलिसांच्या ताब्यात असेल. आसाराम बापूंचे मध्य प्रदेशातील छिंदवाडा गुरूकुलातील हॉस्टेल वॉर्डन शिल्पीसोबत शारीरिक संबंध असल्याची माहितीही शिवाने दिली आहे.
बापूंनी शिल्पीला एक दिल्लीमध्ये आणि एक अहमदाबादमध्ये असे दोन फ्लॅट्सही भेट दिले होते, असं सांगण्यात येत आहे. शिल्पी वारंवार आसाराम बापूंकडे तरुण मुली आणि महिलांना पाठवत असे. उपचारांचा बहाणा करत आपल्या ध्यान कुटीमध्ये आसाराम बापू महिलांना घेऊन जात आणि त्यांचं लैंगिक शोषण करत, असं शिवाने पोलिसांना सांगितलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013 - 21:05
comments powered by Disqus