बलात्कार करणाऱ्या काँग्रेसी नेत्याची बेदम धुलाई

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, January 3, 2013 - 17:13

www.24taas.com, चिरांग
आसामच्या चिरांग भागात विक्रम सिंग ब्रह्म या काँग्रेसच्या नेत्याची स्थानिकांनी बेदम धुलाई केली. या नेत्याला लोकांनी लाथा-बुक्क्यांनीच नव्हे, तर चपला, बुटांनीही मारलं. जी वस्तू हाताला लागेल, ती घेऊन या नेत्यांची लोकांनी धुलाई केली. काँग्रेस नेता मदतीसाठी ओरडत राहीला. मात्र लोक त्याला बदडतच राहीले.
काँग्रेसचा नेता विक्रम सिंग ब्रह्म याच्यावर एका महिलेचा घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा बलात्कार पीडित या महिलेने आक्रोश केला, तेव्हा या आरोपी नेत्याला लोकांनी पकडल आणि बेदम मारहाण केली. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची जबाब नोंदवला आणि आरोपी नेत्याविरोधात तक्रार नोंदवली.
पुढच्याच महिन्यात पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. अशा वेळी काँग्रेस नेत्याचं हे घृणास्पद वर्तन काँग्रेससाठी महागात पडू शकतं. कारण विक्रम सिंग बोडोलँड टेरिटोरियल काउंसिल च्या काँग्रेस कमिटीचा संयोजक आहे. आसामच्या लोकल टीव्ही चॅनल्सवर विक्रमसिंगला मारतानाचं फुटेज बऱ्याच वेळा दाखवलं गेलं.

First Published: Thursday, January 3, 2013 - 17:13
comments powered by Disqus