उद्धव ठाकरे दिल्ली दरबारी, अनेकांच्या भेटीगाठी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय जीवनातल्या पहिल्याच दिल्ली दौ-यावर आहेत. उद्धव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद, संसंदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला, अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2013, 09:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय जीवनातल्या पहिल्याच दिल्ली दौ-यावर आहेत. उद्धव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद, संसंदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला, अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली.
दिल्लीत तीन दिवसांची असोचेमची परिषद आयोजित करण्यात आलीय. या परिषदेत देशातल्या उद्योगपतींसमोर उद्धव ठाकरे भाषण करतील. या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंगही हजर राहतील. यावेळी सौ. रश्मी ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे देशभरातील उद्योगपतींना मार्गदर्शन करणार आहेत.

रुपयाची सातत्याने होणारी घसरण आणि परिणामी बिकट होत चाललेली अर्थव्यवस्था, तसेच उद्योग जगतासमोर उभी राहिलेली नवी आव्हाने अशा विविध विषयांवर उद्योगपतींनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि गार्हा णी मांडली. देशातील उद्योगपतींची संघटना असलेल्या ‘असोचेम’च्या ९२व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप आज होत आहे. या अधिवेशनाला उद्योग जगतातील नामवंतांची मांदियाळीच भरली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.