एटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार

 पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

Updated: Nov 8, 2016, 09:02 PM IST
एटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार title=

मुंबई : पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.

500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा आज मध्य रात्रीपासून बंद होणार आहेत. 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रूपयाची नोट आणि नाणे यांचा उपयोग करता येणार आहे. देशवासियांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

500 आणि 2000 च्या नव्या नोटा आता जाहीर करण्यात येणार आहेत. 500 आणि 1,000 रुपयाची नोट, 10 नोव्हेबंर ते 30 डिसेंबरपर्यंत बँक किंवा डाकघर येथे जमा करायचे आहेत. तुमचा पैसा तुमचाच राहणार आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही राहणार आहे. 9 नोव्हेंबर आणि काही ठिकाणी 10 नोव्हेंबरला ATM बंद राहणार आहे. 

10 ते 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000 च्या नोटा बँकांमध्ये जमा करायचे आहेत. 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्विकारणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्या सगळ्या बँका बंद राहणार आहेत. सीमेपलीकडून नकली नोटा मोठ्या प्रमाणात भारतात आणल्या जातात. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे.