आता एटीएम आणि डेबिट कार्ड म्हणजेही 'चलन'

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने 'चलन' या संकल्पनेच्या व्याख्येत काही सुधारणा केली आहे. 

Updated: Feb 8, 2016, 09:29 AM IST
आता एटीएम आणि डेबिट कार्ड म्हणजेही 'चलन' title=

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने 'चलन' या संकल्पनेच्या व्याख्येत काही सुधारणा केली आहे. आता या नव्या व्याख्येनुसार एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड या दोन्ही गोष्टींचा चलनात समावेश झाला आहे.

'डेबिट कार्ड, एटीएम कार्ड किंवा अशी कोणतीही वस्तू जिचा वापर वित्तीय हस्तांतरणासाठी केला जाऊ शकतो तिला चलन म्हटले जाऊ शकते', असे आरबीआयने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलेय. 

त्याचप्रमाणे आरबीआयने नव्याने काढलेल्या एका अधिसूचनेनुसार आता पोस्ट ऑफिसमधूनही परकीय चलनाची खरेदी केली जाऊ शकते. हे चलन पोस्टल ऑर्डर किंवा मनी ऑर्डर या स्वरुपात खरेदी केले जाऊ शकते. २९ डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात आलाय.