आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध

भारतीय नौदलातल्या ताफ्यातली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध होणार आहे. नौदलाच्या युद्धनौकांवर अशा प्रकारे एटीएम मशीन बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

Updated: Jan 21, 2017, 01:34 PM IST
आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध  title=

नवी दिल्ली : भारतीय नौदलातल्या ताफ्यातली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध होणार आहे. नौदलाच्या युद्धनौकांवर अशा प्रकारे एटीएम मशीन बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

आयएनएस या युद्धनौकेवर सुमारे दीड हजार नौदल अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. आता या नौकेवर एसबीआयचं एटीएम लावलं जाणार आहे. विक्रमादित्य ही नौका अनेक छोट्या मोठ्या बंदरांवर जात असते. 

त्या बंदरांवर उतरल्यावर नौकेवरच्या कर्मचा-यांना रोख रक्कम मिळवणं कठीण जात होतं. पण आता हे एटीएम मशीन बसवल्यानं कर्मचा-यांना त्याचा फायदा होणार आहे.