‘बाबा रामदेवनंच केले गुरुंचे तुकडे – तुकडे’

‘बाबा रामदेवनंच आपल्या गुरुंचे तुकडे-तुकडे करून गंगा नदीत फेकून दिले’ असा आरोप एका इसमानं सोशल मीडियाच्या मदतीनं केलाय... बाबा रामदेवांनी हे कृत्य करताना आपण स्वत: घटनास्थळी हजर होतो, असा दावाही या इसमानं एका व्हिडिओमध्ये केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 9, 2013, 01:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘बाबा रामदेवनंच आपल्या गुरुंचे तुकडे-तुकडे करून गंगा नदीत फेकून दिले’ असा आरोप एका इसमानं सोशल मीडियाच्या मदतीनं केलाय... बाबा रामदेवांनी हे कृत्य करताना आपण स्वत: घटनास्थळी हजर होतो, असा दावाही या राकेश नावाच्या इसमानं एका व्हिडिओमध्ये केलाय.
बाबा रामदेव यांचे गुरु काही वर्षांपूर्वी हरिद्वारच्या आश्रमातून अचानक गायब झाले होते. त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनाही आहे. बाबा रामदेव यांच्यावरही या प्रकरणात अनेक वेळा संशय व्यक्त करण्यात आलाय. पण, कोणताही पुरावा न मिळाल्यानं उत्तराखंड पोलीस अजून कोणतंही ठोस पाऊल उचलू शकलेले नाहीत. परंतू, नुकताच एक व्यक्ती स्वत:हून सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आलाय. त्यानं यू ट्यूबवर आपला एक व्हिडिओ अपलोड केलाय. या व्हिडिओमध्ये या व्यक्तीनं दावा केलाय, की ‘बाबा रामदेव यांचे गुरु शंकर देव यांची हत्या झाली आहे आणि ही हत्या दुसरं-तिसरं कुणी नाही तर बाबा रामदेवनंच केलीय’
या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, बाबा रामदेवनं गुरु शंकर देव यांना संपवण्याचा प्लान आपल्यासमोर बनवला होता. रामदेव यांनी पहिल्यांदा आपल्या गुरुंची हत्या केली त्यानंतर ही गोष्ट उघड होऊ नये म्हणून त्यांच्या शवाचे छोटे छोटे तुकडे करून ते गंगा नदीत फेकून दिले.
शंकर देव गायब झाल्यानंतर आजवर त्यांचा पत्ता लागलेला नाही. पोलिसांना त्यांच्या घरातून एक पत्र मिळालं होतं... ‘मी शंकरदेव आपली खराब आर्थिक स्थिती आणि अस्वास्थ्याच्या कारणामुळे निघून जातोय’ असं या पत्रात म्हटलं होतं. परंतू, हे पत्र राकेश नावाच्या एका व्यक्तीनं बाबा रामदेवांच्या सांगण्यावरूनच लिहिलं होतं असं या व्यक्तीनं व्हिडिओमध्ये म्हटलंय.

व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती सध्या जंतर-मंतर रोडवर धरणं आंदोलनामध्ये सहभागी आहे. २००४ सालापासून तो बाबा रामदेवांना ओळखतो. आपण याबद्दल उत्तराखंड पोलिसांना याबद्दल माहिती दिली असून पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आपण तयार असल्याचंही त्यानं म्हटलंय. त्यामुळेच बाबा रामदेवांच्या टोळक्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक कॉपी करून दुसऱ्या टॅबमध्ये ओपन करा
http://goo.gl/i798l