बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हातात बंदुका कशासाठी?

अयोध्येमध्ये बजरंग दलाच्या शिबिरात झालेली प्रात्यक्षिकं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीत.

Updated: May 24, 2016, 08:27 PM IST
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हातात बंदुका कशासाठी? title=

अयोध्या : अयोध्येमध्ये बजरंग दलाच्या शिबिरात झालेली प्रात्यक्षिकं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीत.

आत्मसंरक्षणासाठीचं बजरंग दलाचं वार्षिक शिबीर नुकतंच पार पडलं. या शिबिरात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बजरंग दल कार्यकर्ते खात्मा करत असल्याचं दाखवण्यात आलंय. यावेळी त्यांच्या हातात बंदुकाही देण्यात आल्या होत्या. 

या प्रशिक्षणाचं प्रयोजन काय?

मुळात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं कारण काय? असा सवाल आता केला जातोय. 

यूपी निवडणुकीची रंगीत तालिम?

भारतमाता की जय, जय श्रीराम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत बजरंग दल कार्यकर्ते बंदुका चालवतायत... हा आत्मसंरक्षणाचा भाग आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधीची ही रंगीत तालिम तर नाही ना? अशीही शंका उपस्थित होतेय.