बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श

 गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. हार्दिक पटेल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितले. 

Updated: Aug 28, 2015, 05:54 PM IST
बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श  title=

गांधीनगर :  गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. हार्दिक पटेल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितले. 

एखादा राजकीय पक्ष तयार करण्याबद्दल हार्दिकला विचारले असता, तो म्हणाला, रिमोट माझ्या हातात आहे. त्यामुळे कोणताही पक्ष बनविण्याचा किंवा त्यात सामील होण्याची गरज काय? बाळासाहेब ठाकरे यांनी जसे रिमोट कंट्रोलने १९९५ चे महाराष्ट्र सरकार चालविले होते. हीच गोष्ट हार्दिकला भावली, असण्याची शक्यता आहे. 

सरदार पटेल ग्रुप अध्यक्ष
पाटीदार अनामत आंदोलन समिती (paas)चे संयोजक पद भूषविण्यापूर्वी हार्दिक पटेल सरदार पटेल ग्रुप (SPG)चा अध्यक्ष होता. २०१२ ते २०१४ या कालावधी अध्यक्षपद भूषविले. १७ जिल्ह्यातील ४० हजार युवकांच्या या ग्रुपचा उद्देश समाज, महिला आणि शेतकऱ्यांचे रक्षण हा होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.