LIVE - 'हा दहशतवादी हल्ला आहे, भाजप निशाण्यावर'

बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत. झी मीडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटासाठी आयइडीचा वापर करण्यात आला होता.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 17, 2013, 04:45 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
बंगळुरु स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्रालयाने आदेश दिलेत. तसंच या स्फोटानंतर कर्नाटक सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.
Live Updates:
2.00 pm 'हा दहशतवादी हल्ला आहे, भाजप निशान्यावर... दोषींना लवकरच अटक करण्यात येईल' - बंगळुरू स्फोटावर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचं वक्तव्य
1:45 pm तीन तासानंतर हैबल इथं न्यू एअरपोर्ट परिसरात दुसरा स्फोट झाल्याची अफवा

1.13 pm स्फोट झालेल्या कारमध्ये कोणतेही एलपीजी किट नव्हते - सूत्र
1.10 pm कर्नाटकचे गृहमंत्री आर. अशोक घटनास्थळी दाखल
1 pm स्फोटासाठी इप्रोवाइज एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयइडी)चा वापर, सूत्रांनी झी मीडियाला सांगितले.
12.40 am पोलीस सर्व शक्यतांचा तपास करीत आहेत.
सर्वांना शांततेचे आवाहन करीत असल्याचे गृहसचिव आरपीएन सिंग यांनी सांगितले.
12.20 am एनआयएची टीम घटनास्थळी दाखल
12.15 am जखमींनी मालिज रुग्णालयात दाखल केले.

बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत. झी मीडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटासाठी आयइडीचा वापर करण्यात आला होता.
बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय.
बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास बंगळुरूमध्ये झालेल्या स्फोटात १६ जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये आठ पोलीस आणि सहा नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी स्फोटाच्या आजुबाजुचा परिसर सील केलाय. घटनेनंतर थोड्याच वेळात बंगळुरूचे पोलीस आयुक्तदेखील घटनास्थळी दाखल झालेत.
सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पोलीस आयुक्तांनी ही शक्यता फेटाळून लावलीय. हा स्फोट घडवण्यासाठी आयडीचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. हा स्फोट घडवून आणण्यासाठी पुन्हा एकदा बाईकचा वापर झाल्याची माहिती मिळतेय.