एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता इतकेच ट्रांजेक्शन फ्री

नोटबंदीनंतर सरकारने देशभरात कॅशलेस इकोनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यासाठी बँकेच्या काही नियमांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. १ मार्चपासून या नियमांमध्ये बदल होणार आहे.

Updated: Feb 27, 2017, 03:25 PM IST
एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता इतकेच ट्रांजेक्शन फ्री title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सरकारने देशभरात कॅशलेस इकोनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यासाठी बँकेच्या काही नियमांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. १ मार्चपासून या नियमांमध्ये बदल होणार आहे.

एचडीएफसी बँक

४ वेळा पैसे काढल्यानंतर त्यावर कोणताही चार्ज नाही लागणार. त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनवर १५० रुपये सर्विस चार्ज लागेल.

होम ब्रांचमधून प्रत्येक महिन्याला एका अकाऊंटमधून २ लाखापर्यंतच पैसे देवानघेवान करु शकता.

त्याच्यावर प्रत्येकी हजार रुपयावर ५ रुपयाप्रमाणे कमीतकमी १५० रुपये चार्ज लागेल.

दुसऱ्या ब्रांचमधून रोज २५ हजारापर्यंत ट्रांजेक्शन फ्री असणार आहे.

सीनियर सिटिजन आणि १८ वर्षाखालील मुलांच्या अकाउंटवर कोणतेही चार्ज नाही लागणार.

अॅक्सिस बँक

१ लाखांच्या वरील ट्रान्सजेक्शनवर प्रत्येकी हजार रुपयावर ५ रुपये प्रमाणे चार्ज लागेल. ५ व्या ट्रॅनजेक्शनवर १५० किंवा हजार रुपयावर ५ रुपये अशा प्रकारे चार्ज लागेल.

आयसीआयसीआय बँक

होम ब्रँचमध्ये ४ पेक्षा अधिक ट्रँजेक्शनवर कमीत कमी १५० रुपये चार्ज लागेल.

एटीएमवर पुन्हा लागणार चार्ज

नोटबंदीनंतर आता एटीएममधून कॅश काढण्यासाठी १०००० रुपयांची लिमिट आहे तर आठवड्याला ५० हजार रुपयांपर्यंतची लिमिट आहे.

RBI ने जुन्या नियमांच्या आधारे एटीएमएममधून ५ पेक्षा अधिक वेळा ट्रानजेक्शनवर २० रुपये चार्ज लागेल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये इतर बँकेच्या एटीएममधून ३ ट्रान्जेक्शन फ्री आहे. त्यानंतर तर इतर शहरांमध्ये ५ ट्रान्जेक्शन फ्री आहे. १ जानेवारीपासून हा नियम लागू झाला आहे.

खाजगी बँकाच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आता सरकारी बँकांच्या नियमामध्येही बदल होण्याच्या शक्यता आहे.