१ एप्रिलला बँका राहणार बंद

भारतीय रिजर्व्ह बँकेने बँकांना १ एप्रिलला बँका सुरु ठेवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले होते. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं होतं पण आता १ एप्रिलला बँक बंद राहणार आहे.

Updated: Mar 30, 2017, 07:22 PM IST
१ एप्रिलला बँका राहणार बंद title=

मुंबई : भारतीय रिजर्व्ह बँकेने बँकांना १ एप्रिलला बँका सुरु ठेवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले होते. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं होतं पण आता १ एप्रिलला बँक बंद राहणार आहे.

३१ मार्चला २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपणार असून एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे करभरणा आणि सर्व आर्थिक व्यवहार सुलभ व्हावे या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला होता. 

आरबीआयने म्हटलं की, 'सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की, बँकांना १ एप्रिलपर्यंत बँका उघड्या ठेवण्याचे आदेश आता मागे घेण्यात येत आहेत. १ एप्रिलला बँक उघडी ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. एसबीआयमध्ये त्यांच्या ५ सहकारी बँका आणि भारतीय महिला बँकेचं विलनीकरण करण्यात येणार आहे.