बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार

नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Updated: Feb 3, 2017, 07:43 PM IST
बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार  title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार असल्याचं अर्थसचिव शक्तीकांता दास यांनी सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेकडून कधीही मर्यादा हटवल्याची घोषणा होऊ शकते अशी प्रतिक्रिया दास यांनी दिली आहे. दरम्यान नोटबंदीनंतर चलनातून रद्द झालेल्या नोटांएवढ्याच नव्या नोटा पुन्हा एकदा चलनात आल्या असल्याची माहिती शक्तीकांता दास यांनी दिली आहे.

बँकांमधून आठवड्याला जास्तीत जास्त 24 हजार रुपये काढता येत आहेत, तसंच एटीएममधून एकाच वेळी 24 हजार रुपयेही काढता येत आहेत. आठ नोव्हेंबरला नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर बँकांमधून सुरुवातीला दिवसाला दोन हजार रुपये आणि त्यानंतर दिवसाला चार हजार रुपये काढता येत होते.