आता, बँकाही लावणार खिशाला चाट!

पुढच्या महिन्यापासून तुमच्या खिशावरचं ओझं आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, येत्या १ एप्रिलपासून अनेक बँका आपल्या विविध सेवांवर शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2014, 07:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुढच्या महिन्यापासून तुमच्या खिशावरचं ओझं आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, येत्या १ एप्रिलपासून अनेक बँका आपल्या विविध सेवांवर शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत. हा निर्णय लागू करण्याचा विचार केवळ खाजगी बँकांचा नाही तर सरकारी बँकांही करत आहेत.
सध्या, अनेक बँका एसएमएस अलर्ट सेवेसाठी तीन महिन्यांसाठी १५ रुपये शुल्क आकारतात. परंतु, आता खाजगी सेक्टरमधील धनलक्ष्मी बँकेनं एक एप्रिलपासून एसएमएस अलर्ट सेवेसाठी केवळ ५० पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय.
एक्सिस बँकेनं इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम (ईसीएस) डेबिटच्या फोलपणासाठी ३५० रुपये शुल्क आकारण्याची तयारी केलीय. हेच शुल्क याअगोदर २०० रुपये होतं. जर तुमच्या अकाऊंटमध्ये कमीत कमी निर्धारित केलेली रक्कम नसेल तर तुम्हाला आता २५० रुपये प्रती महिन्याऐवजी, तीन महिन्यांसाठी ७५० रुपये शुल्क आकारलं जाईल.
याच पद्धतीनं डीडी आणि डुप्लिकेट पिनसाठी १०० रुपयांचं शुल्क आकारलं जाईल. युनियन बँकेनं १० हजार रुपयांपर्यंचा डिमांड ड्राफ्ट बनविण्यासाठी आपली फी ३८ रुपयांवरून ५० रुपये केलीय.
सिटी युनियन बँकेनं लॉकर चार्जेसमध्ये वाढ केलीय. मोठ्या लॉकरसाठी आत्तापर्यंत आकारल्या जाणाऱ्या २००० रुपयांत वाढ करून हे शुल्क आता ५००० रुपये करण्यात आलंय.
अनेक बँकांमध्ये डिमांड ड्राफ्ट (डीडी) रद्द करण्यासाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.