चहावाला पंतप्रधान झाला त्यावर ओबामा म्हणाले...

बराक ओबामा यांनी दिल्लीत फोर्ट सिटी सभागृहात केलेल्या भाषणात अनेक महत्नाचे मुद्दे मांडले, यातओबामांनी आपल्या भाषणात काळ्या गोऱ्या भेदभावाचाही उल्लेख केला, असे भेदभाव सर्वच ठिकाणी आहेत, भारतातही, असं ओबामांनी म्हटलंय.

Updated: Jan 27, 2015, 04:13 PM IST
चहावाला पंतप्रधान झाला त्यावर ओबामा म्हणाले... title=

नवी दिल्ली : बराक ओबामा यांनी दिल्लीत फोर्ट सिटी सभागृहात केलेल्या भाषणात अनेक महत्नाचे मुद्दे मांडले, यातओबामांनी आपल्या भाषणात काळ्या गोऱ्या भेदभावाचाही उल्लेख केला, असे भेदभाव सर्वच ठिकाणी आहेत, भारतातही, असं ओबामांनी म्हटलंय.

ओबामा पुढे म्हणाले, माझे आजोबा लष्करात खानसामा होते, पत्नी मिशेलच्या परिवारातील लोक गुलाम राहिले आहेत, गुलामांचे मालकही होते, मी भेदभाव अनुभवला आहे, माझ्या रंगामुळे, पण तरीही आम्ही पुढे आलो आहोत. आम्ही अशा देशामध्ये राहत आहोत, जेथे एक खानसामाचा नातू राष्ट्रपती होऊ शकतो आणि एक चहावाला पंतप्रधान.

सोशल मीडियाचा उल्लेख करतांना ओबामा म्हणाले, 'आता तर आपण फेसबुक, ट्विटर, व्हाटसअॅपने एकमेकांशी जोडले गेलो आहोत. तसेच भारत आणि अमेरिका हे चांगले मित्र होऊ शकतात.'

ओबामा म्हणाले, 'जगात भारताचं काय स्थान  असेल हे भारताला ठरवायचं आहे, मात्र आम्हाला वाटतंय भारत आणि अमेरिकाने मिळून मोठ मोठी कामं  करावीत. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल, मुलांचं भविष्य सुरक्षित होईल, अमेरिका भारताच्या विकास यात्रेत सहभागी होऊ इच्छीतो, आम्ही नवनवीन कल्पना, योजना आखण्यासाठी अमरिका आपला सहकारी होऊ इच्छीत आहे'.

ओबामा यांनी पर्यावरण आणि सुरक्षेचा उल्लेख करतांना म्हटलं, 'दोन्ही देश दहशतवादाचा धोका ओळखून आहेत. अमेरिका भारताचं संरक्षण क्षेत्रातही स्वागत करीत आहे'.

'आमचं लक्ष्य असं आहे की जगात आण्विक अस्त्र नसावीत,  असं जग निर्माण करू या, भारताला यासाठी आमची पूर्ण मदत करावी लागेल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार होऊन भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं'. असं ओबामा म्हणाले.

भारताने स्वच्छ उर्जा उत्पादनात पुढाकार दाखवला आहे, भारताने उचललेल्या या पावलाचं स्वागत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.