एअर इंडियाचा 100 रुपयांमध्ये प्रवास

 विमानानं जाण्याचं तुमचं स्वप्न अत्यंत कमी खर्चात साकार होणं आता शक्य आहे. एअर इंडियाचं तिकीट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत, तब्बल महिन्याभराच्या प्रवासासाठी 100 रुपयांमध्ये एअर तिकीट काढता येणार आहे. अर्थात, त्यासाठी आजपासून 31 तारखेपर्यंत बुकिंग करणं आवश्यक असेल.

Updated: Aug 27, 2014, 12:27 PM IST
एअर इंडियाचा 100 रुपयांमध्ये प्रवास

नवी दिल्ली : विमानानं जाण्याचं तुमचं स्वप्न अत्यंत कमी खर्चात साकार होणं आता शक्य आहे. एअर इंडियाचं तिकीट आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत, तब्बल महिन्याभराच्या प्रवासासाठी 100 रुपयांमध्ये एअर तिकीट काढता येणार आहे. अर्थात, त्यासाठी आजपासून 31 तारखेपर्यंत बुकिंग करणं आवश्यक असेल.

एअर इंडियाच्या वेबसाईटवरूनट तिकीट बुक करणंही बंधनकारक असेल... 2007 साली झालेल्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स विलिनीकरणानिमित्त दिवस एअर इंडिया डे साजरा केला जाणार आहे.त्यासाठी प्रवाशांना अवघ्या 100 रुपयांमध्ये हवाई सफर घडवण्याची ही योजना कंपनीनं राबवली आहे.

यानिमित्त एका खास कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येणार असून त्यात चांगली कामगिरी बजावणा-या कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.