बेळगाव पालिकेत मराठी भाषिकांची आघाडी

By Surendra Gangan | Last Updated: Monday, March 11, 2013 - 11:20

www.24taas.com,बेळगाव
बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. आतार्यंत जाहीर झालेल्या १८ निकालांपैकी ११ मराठी, २ उर्दु तर ५ कन्नड विजयी उमेदवार झाले आहेत. मराठी भाषिकांनी आघाडी घेतली आहे.
विद्यमान महापौर देणू किल्लेकर यांना तर माजी महापौर मंदा बाळकुंद्री यांना पराभवाचा धक्का पराभवाचा धक्का बसलाय. किल्लेकर यांना माया कडोलकर यांनी पराभूत केले आहे. कन्नड भाषिकांना चांगलाच दणका मिळालेला दिसत आहे. मराठी भाषिकांचे पालिकेवर पुन्हा वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

बेळगाव पालिका निवडणूक निकाल
-वार्ड क्रमांक ६मधून विनायक गुंजटकर ,
-वार्ड क्रमांक १६ - विजय लक्ष्मण पाटील,
-वार्ड क्रमांक ४६ -व्ही. लोकेश,
-वार्ड क्रमांक २६ - मेघा हळदणकर.
-वार्ड क्रमांक ४१ - सरला येरेकर
-वार्ड क्रमांक २मधून - रुपाली नेसरकर,
-वार्ड क्रमांक २२मधून रवी धोत्रे,
-वार्ड क्रमांक ५१- बंदे नवाज बाळेकुंद्रे.
-वार्ड क्रमांक १७- पंढरी परब,
-वार्ड क्रमांक ५२मधून दिनेश नाखिपुरी,
-वार्ड क्रमांक २७मधून वैशाली उलगी
-वार्ड क्रमांक ३६ मधून बाबूलाल मुजावर

First Published: Monday, March 11, 2013 - 11:07
comments powered by Disqus