बेळगाव महापालिका निवडणूक मतदानाला सुरवात

बेळगावात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Updated: Mar 7, 2013, 10:41 AM IST

www.24taas.com, बेळगाव
बेळगावात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बेळगाव महापालिकेत एकूण ५८ जागा असून त्यापैकी दोन जागांवर एकिकरण समितीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
त्यामुळं आज ५६ जागांसाठी मतदान सुरु झालं आहे. मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीत सर्व मराठी भाषिक मतदार एकजुटीने रिंगणात उतरले आहेत.