बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी राज, सायनाक महापौर

 बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा फडकला भगवा झेंडा फडकला. महापौरपदी मराठी भाषिक किरण सायनाक तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड करण्यात आली आहे.

Updated: Mar 7, 2015, 04:48 PM IST
बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी राज,  सायनाक महापौर title=

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा फडकला भगवा झेंडा फडकला. महापौरपदी मराठी भाषिक किरण सायनाक तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला पुन्हा एकदा चाप बसला. बेळगाव महानगरपालिकेवर मराठी झेंडा फडकला आहे. बेळगांव महानगरपालिकेत महाराष्ट्र एकिककरण समितीच्या किरण सायनाक यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड झाली आहे, त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महापौर व उपमहापौर मराठी भाषिकच करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कंबर कसली होती. महानगरपालिकेवर पुन्हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी एकजुटीची ताकद दाखवण्याचा निश्चय सर्वानुमते घेण्यात आला होता. त्यानुसार यश आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.