दारु न दिल्याने पोलिसांकडून हॉटेल मॅनेजरला मारहाण

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, March 20, 2017 - 20:08
दारु न दिल्याने पोलिसांकडून  हॉटेल मॅनेजरला मारहाण

बेळगाव : ड्राय डेच्या दिवशी दारू न दिल्याने हॉटेल मँनेजरला मारहाण केल्याची घटना कागवाड येथे घडली.  हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

सीसीटीव्ही फुटेज बघून जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी मॅनेजर अजित आणि राजू यांना धक्का- बुक्की करुन लाथा आणि बुक्क्याने मारहाण करण्यात आली. 

या मारहाणीत ते जखमी झाले असून त्यांच्यावर कागवाड येथील प्राथमिक रुग्णालयात प्रथोमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ड्राय डे असूनही हे पोलीस दारू मागत होते. मॅनेजरने नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 
हे पोलीस नेहमी जेवण आणि दारू मोफत घेत असतात. तसेच महिन्याला तीस हजार हप्ताही वसूल करतात, असा आरोपही हॉटेल मॅनेजरने केला आहे.

First Published: Monday, March 20, 2017 - 20:08
comments powered by Disqus