एकत्रित प्रयत्नांतूनच 'टीम इंडिया' पुढे जाईल: मोदी

'केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून टीम इंडिया प्रमाणे काम केलं पाहिजे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान हे भारत-बांगलादेश सीमा कराराच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर आज पश्‍चिम बंगालचा दौऱ्यावर होते.

Updated: May 10, 2015, 06:52 PM IST
एकत्रित प्रयत्नांतूनच 'टीम इंडिया' पुढे जाईल: मोदी  title=

कोलकाता : 'केंद्र आणि राज्य सरकार यांनी मिळून टीम इंडिया प्रमाणे काम केलं पाहिजे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान हे भारत-बांगलादेश सीमा कराराच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर आज पश्‍चिम बंगालचा दौऱ्यावर होते.

'टीम इंडिया'या भावनेने इतर राष्ट्रांशी असलेले प्रश्‍न सोडविले जाऊ शकतात. मग याच भावनेने काम केल्यास देशांतर्गत समस्यांवरही सहज तोडगे काढता येऊ शकतील, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

भारत-बांगलादेशमधील सीमेचा प्रश्‍न सोडविण्यासाठीच्या प्रस्ताव संसदेमध्ये एकमताने मंजूर झाला. 'यामध्ये सर्व राजकीय पक्ष आणि केंद्र सरकार, पश्‍चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांनीही एकदिलाने काम केले,' असे मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, "मीदेखील अनेक वर्षे मुख्यमंत्री होतो. त्यामुळे केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या वागणुकीचा कुणालाही फायदा होणार नाही, हे मला ठाऊक होते. आपल्या राज्यघटनेने आपल्याला संघराज्य पद्धत दिली आहे. 

मात्र दुर्दैवाने केंद्र आणि राज्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. केवळ दिल्ली देशावर राज्य करू शकत नाही. आपला देश ३० खांबांवर  म्हणजेच राज्यांवर उभा आहे. पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री यांनी एक 'टीम' म्हणून काम केले पाहिजे.' असंही मोदींनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.