'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या

पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय. 

Updated: Jun 28, 2016, 06:08 PM IST
'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या  title=

बंगळुरू : पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय. 

भारती ही कॅब कंपनी 'उबेर'मध्ये काम करत होती. आपल्या घरात गळफास घेऊन तीनं आत्महत्या केल्याचं समजतंय. भारतीची कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नाही. ती आपल्या घरात एकटी राहत होती. 

भारतीची टॅक्सी तिच्या घरासमोर दीर्घकाळ उभी असलेली रहिवाशांना दिसली. त्यानंतर सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास भारतीच्या घरमालकानं घरात पाहिलं असता भारती फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केलं.


वीरथ भारती

२०१३ साली महिला ड्रायव्हर म्हणून काम सुरू केलं तेव्हा भारती सगळ्या वर्तमानपत्रांची हेडलाईन बनली होती. मूळची तेलंगणाची असलेली भारती उत्तर बंगळुरूमध्ये नागाशेटीहल्ली भागात भारती राहत होती. एका एनजीओच्या मदतीनं २००७ साली भारती ड्रायव्हिंग शिकली होती.