भारतात ‘वॉलमार्ट` आणि `भारती` स्वतंत्रपणे करणार व्यापार

भारती एंटरप्रायजेज आणि वॉलमार्ट स्टोअर्स या दोन कंपन्यांनी आपल्या भागिदारांची चर्चेला पुर्णविराम दिलाय. त्यांनी आपली भागिदारी तोडण्याचा निर्णय घेतला असून भारतात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय आज जाहीर केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 9, 2013, 11:55 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारती एंटरप्रायजेज आणि वॉलमार्ट स्टोअर्स या दोन कंपन्यांनी आपल्या भागिदारांची चर्चेला पुर्णविराम दिलाय. त्यांनी आपली भागिदारी तोडण्याचा निर्णय घेतला असून भारतात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय आज जाहीर केलाय.
अमेरिकेची वॉलमार्ट कंपनी भारतात होलसेल मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत असून आपल्या भारतीय भागिदाराकडून त्यांनी त्यांची भागिदारी विकत घेतलीय. भारती आणि वॉलमार्ट दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतलाय. आता भारती रिटेल मार्केटमध्ये आणि वॉलमार्ट होलसेल मार्केटमध्ये उतरेल.
भारत सरकारनं सप्टेंबर २०१२ मध्ये भारतात ५१ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजेच एफडीआयला परवानगी दिली होती. त्यामुळं परदेशी कंपन्या भारतात होलसेल आणि रिटेल मार्केटमध्ये उतरण्याचा मार्ग मोकळा झाला होता. याच पार्श्वभूमीवर भारती आणि वॉलमार्ट या कंपन्यांना संयुक्तरित्या भारतात उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता या दोन्ही कंपन्यांच्या निर्णयात बदल झाला असून, दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे भारतीय मार्केटमध्ये उतरणार आहे.
भारती एंटरप्रायजेजचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन भारती मित्तल म्हणाले, “भारती एक विश्वस्तरीय रिटेल उद्योग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. २१२ स्टोअर्स असून आपला व्यापार वाढवणं आणि ग्राहकांना खूश करण्याची आमची इच्छा आहे”. मात्र भारतीच्या या निर्णयानंतर त्यांच्या निर्देशांकात घट झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.