'मला तर पास व्हायचं होतं... बाबांनी टॉपरच बनवून टाकलं'

बिहारची टॉपर रुबी राय आता मात्र रडकुंडीला आलीय. 'मैं ने तो पापा से कहा था पास करवा दीजिए, उन्होंने तो टॉप ही करवा दिया' असं म्हणत तीनं या घोटाळ्याची साफ पोलखोल केलीय. 

Updated: Jun 28, 2016, 06:08 PM IST
'मला तर पास व्हायचं होतं... बाबांनी टॉपरच बनवून टाकलं' title=

बिहार : बिहारची टॉपर रुबी राय आता मात्र रडकुंडीला आलीय. 'मैं ने तो पापा से कहा था पास करवा दीजिए, उन्होंने तो टॉप ही करवा दिया' असं म्हणत तीनं या घोटाळ्याची साफ पोलखोल केलीय. 

अनेकदा नोटीस देऊन तथाकथित 'आर्टस टॉपर' रुबी पुर्नपरिक्षेसाठी उपस्थित राहिली नव्हती. शेवटी शनिवारी तिला एसआयटी बोर्ड कार्यालयाच्या बाहेरच अटक करण्यात आली. 

रुबीचं आर्जव

'साहेब मी गावाकडची मुलगी आहे. मला माहित नाही मी कसं टॉप केलं' असं आर्जवही रुबीनं पोलिसांसमोर करून दाखवलंय. इतकंच नाही तर आता आपल्याला टॉपर व्हायचं नाहीय... पण सेकंड क्लास देऊनच पास करा अशी विनवणीही तिनं अधिकाऱ्यांकडे केलीय. तिला ८ जुलैपर्यंत ज्युडिशिअल कस्टडीमध्ये ठेवण्याचे ऑर्डर कोर्टानं दिलेत. 

कसं उघडकीस आलं हे प्रकरण 

या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा एका स्टिंग ऑपरेशननंतर झाला होता. 'आर्टसची टॉपर' असलेल्या रुबीनं पॉलिटिकल सायन्सचा उल्लेख 'प्रॉडिकल सायन्स' असा केला होता. इतकंच नाही तर या विषयात जेवण बनवणं शिकवलं जातं असंही तिनं म्हटलं होतं.

मानवाधिकार आयोगानंही घेतली दखल

दरम्यान, रुबी अल्पवयीन असल्यानं या प्रकरणात पाटणा पोलीस जुवेनाइल जस्टिस अॅक्टच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अडचणीत येऊ शकतात. या प्रकरणात मानवाधिकार आयोगानंही संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केलीय.