महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची बदली

महाराष्ट्र सदनाच्या वादात चर्चेत आलेले, दिल्लीतले महाराष्ट्राचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची अखेर बदली झाली आहे. मलिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली. 

Updated: Jan 12, 2015, 09:34 AM IST
महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची बदली title=

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनाच्या वादात चर्चेत आलेले, दिल्लीतले महाराष्ट्राचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची अखेर बदली झाली आहे. मलिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली. 
 
महाराष्ट्र सदनातील मागील काही प्रकरणांमुळे, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या खासदारांच्या रडारवर मलिक होते. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी त्यांची बदली करण्याचा आग्रह सरकारकडे धरला होता, असं म्हटलं जातंय.
  
मलिका मागील चार वर्षांपासून ते या पदावर होते. महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाचा वाद किंवा इतर वादग्रस्त घटना यामुळं मलिक यांच्या भूमिकेवरुन शिवसेना आणि भाजपचे खासदार नाराज होते. 

महाराष्ट्र सदनातल्या निकृष्ट जेवणाबद्दल तक्रार होती, यावरून एका मुस्लिम कर्मचाऱ्याला उपवासाच्या दिवशी बळजबरी चपाती खाऊ घातल्याचा आरोप, शिवसेना खासदारांवर झाल्यानंतर मलिक वादात अडकले होते. यावरून अखेर मलिक यांची महाराष्ट्र सदनातून कामगार व रोजगार मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.