दिल्लीत एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक, वसुंधरा, सुषमा, शिवराज मुद्द्यावरून चर्चा

मोदींचं सरकार आल्यावर एनडीएचं अस्तित्वच धोक्यात आल्याची तक्रार शिवसेनेनं केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावलीय. मंगळवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. 

PTI | Updated: Jul 19, 2015, 10:28 PM IST
दिल्लीत एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक, वसुंधरा, सुषमा, शिवराज मुद्द्यावरून चर्चा title=

नवी दिल्ली: मोदींचं सरकार आल्यावर एनडीएचं अस्तित्वच धोक्यात आल्याची तक्रार शिवसेनेनं केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावलीय. मंगळवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. 

व्यापम घोटाळा, ललित मोदी आणि वसुंधरा राजे, सुषमा स्वराज यांच्यावरून निर्माण झालेला वाद, छत्तीसगडमध्ये झालेले अन्नधान्याच्या वाटपातल्या भ्रष्टाचाराचे आरोप... असे सगळे मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत. शिवाय चौथ्यांदा भू- संपादन अध्यादेश पुन्हा एकदा निरस्त होण्याची शक्यता निर्माण झालीय. 

त्यामुळे चारही बाजूनं अडचणीत सापडलेल्या भाजपला मित्र पक्षांची साथ मिळणं महत्वाचं आहे. म्हणूनच या एनडीएच्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान उद्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.