भाजपमधून राम जेठमलानी यांची हकालपट्टी

भाजपचे नेते राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली... पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

Updated: May 28, 2013, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भाजपचे नेते राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली... पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. भाजपच्या संसदीय समितीनं ही कारवाई केलीये. राम जेठमलानींना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर काढण्यात आलंय
जेठमलानी यावेळेस राज्यसभेचे सदस्य देखील आहेत. त्यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पार्टीतून निलंबित करण्यात आला होतं. त्यावेळेस त्यांनी पक्षावर बरेच टीकास्त्र सोडलं होतं. आणि अनेक गोष्टींबाबत पक्ष नेतृत्वला चांगलचं अडचणीत आणलं होतं.
पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरीच्या पूर्ती कंपंनीविषयी त्यांनी त्यांच्यावर आरोपही केले होते. राम जेठमलानी यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाबाबत देखील नाराजी व्यक्त केली होती. तर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीला देखील त्यांनी विरोध केला होता. आणि त्यानंतर सीबीआय निर्देशक रंजीत सिन्हा यांच्या नियुक्तीवर केलेल्या वक्तव्याने त्यांनी पक्षाला चांगलेच अडचणीत आणले होते.