प्रियांका गांधींचा फोटो झूम करून पाहिला; भाजप आमदार अडचणीत

कर्नाटक भाजपच्या एका आमदारानं पक्षाला अडचणीत आणलंय. भाजपचे प्रभू चव्हाण हे आमदार महाशय विधानसभा सुरु असताना प्रियांका गांधी यांचा फोटो 'नको त्या पद्धतीनं' झूम करून पाहत असलेले दिसले.

Updated: Dec 11, 2014, 09:32 AM IST
प्रियांका गांधींचा फोटो झूम करून पाहिला; भाजप आमदार अडचणीत title=

नवी दिल्ली : कर्नाटक भाजपच्या एका आमदारानं पक्षाला अडचणीत आणलंय. भाजपचे प्रभू चव्हाण हे आमदार महाशय विधानसभा सुरु असताना प्रियांका गांधी यांचा फोटो 'नको त्या पद्धतीनं' झूम करून पाहत असलेले दिसले.

काँग्रेसच्या नेत्या आणि सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांचा या अपमानावर काँग्रेस समर्थकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. या आमदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. 

एका लोकल टीव्हीनं सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये हे भाजप आमदार महोदय प्रियांका गांधी यांचा फोटो झूम करून पाहत असताना दिसतायत... 

व्हिडिओ पाहण्यासाठी - 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.