राम मंदिर बांधणारच- अमित शहा

By Jaywant Patil | Last Updated: Saturday, July 6, 2013 - 16:40

www.24taas.com, झी मीडिया, अयोध्या
निवडणूक जवळ येताच रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपने पुढे आणला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभं करण्याचा मुद्दा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी मांडला आहे.
भाजप सत्तेत आल्यास अयोध्येमध्ये राम मंदिर बांधूच, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. अयोध्येमध्ये बैठकीसाठी आल्यावर बैठकीपूर्वी आपण रामाचं दर्शन घेऊन ल्याचं अमित शाहा यांनी सांगितलं. रामाकडे आपण देशाला काँग्रेसमुक्त करण्याची प्रार्थनाही केली, असं अमित शहा म्हणाले.लवकरच येथे आपण रामाचं मंदिर उभारू, असं अश्वासन अमित शहा यांनी दिलं.
निवडणूक जवळ आली, की भाजप राम मंदिराचा मुद्दा पुढे करतं, मात्र आपल्या कार्य़काळात भाजपने राम मंदिर बांधण्यासाठी काय प्रयत्न केले असा सवाल अनेक जण करतात. मात्र, हिंदुत्वाचाच मुद्दा पुन्हा भाजपाने निवडणुकीसाठी पुढे केला. बाबरी मशिदीच्याच जागेवर राम मंदिर उभारण्याचा भाजपने निर्धार केला असल्याचं अमित शहांनी म्हटलं. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ५० जागा आहेत. या मतदारसंघांसाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपा या पक्षांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. अशावेळी राम मंदिराचा मुद्दा भाजपला यश देईल का? हा सवाल आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 6, 2013 - 16:34
comments powered by Disqus