भ्रष्टाचारात भाजप वर्ल्ड चॅम्पियन - राहुल गांधी

काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधींनी छत्तीसगढ सरकारवर कडाडून टीका केलीय. छत्तीसगढ सरकार भ्रष्टाचाराचे वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 9, 2013, 12:03 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, राजनंदगाव
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधींनी छत्तीसगढ सरकारवर कडाडून टीका केलीय. छत्तीसगढ सरकार भ्रष्टाचाराचे वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.
छत्तीसगडमधील भाजपचे सरकार भ्रष्टाचारामध्ये वर्ल्ड चँपियन्स असून या सरकारला जनतेच्या नव्हे तर काही मूठभर लोकांच्या सक्षमीकरणात रस असल्याची टीका राहुल यांनी शुक्रवारी केली.
छत्तीसगडमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कांकर व राजनंदगाव येथे काँग्रेसच्या प्रचार सभा घेतल्या. त्या वेळी त्यांनी सत्ताधारी भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षम प्रशासनाचा समाचार घेतला.
छत्तीसगढ राज्य श्रीमंत आहे मात्र इथले नागरिक गरीब असल्याचं त्यांनी म्हटलंय. अनेक लोककल्याण योजना काँग्रेसनं आणल्या मात्र भाजप केवळ श्रेय लाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भाजपकडून नागरिकांना केवळ आश्वासनं मिळत असून त्यांची कृती मात्र काहीच नाही. महिला आणि बालकांचा अजूनही विकास झाला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.