बोकोरो बलात्काराबाबत राज्यसभेत कठोर कारवाईची मागणी

Last Updated: Saturday, July 12, 2014 - 16:32
बोकोरो बलात्काराबाबत राज्यसभेत कठोर कारवाईची मागणी

नवी दिल्ली : बोकोरो जिल्ह्यात पंचायत समितीच्या आदेशानंतर एका 10 वर्षाच्या मुलीवर सर्वांसमोर बलात्कार केल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत खासदारांनी हा मुद्दा मांडला. या घृणास्पत घटनेबाबत निंदा करण्यात आली. पंचायतीचा मोरक्याविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी केली.

महिला संघटनांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पंचायतीच्या प्रमुखाच्या आदेशानंतर 10 वर्षीय मुलीवर या मुलीच्या शेजारी राहणाऱ्याने बलात्कार केला. या पिडीत मुलीच्या भावावर महिलेची छेडछाड केल्याचा आरोप होता. याचा बदला घेण्यासाठी पंचायतने अल्पवयीन मुलीवर पंचायतीसमोर बलात्कार करण्याचा तालिबानी फतवा काढला होता.

बलात्कार करणारा 25 वर्षीय आरोपीने 10 वर्षांच्या मुलीला ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. पंचायत प्रमुख भोपाल पासीच्या आदेशानंतर या आरोपीने निच कृत्य केलं. पंचायत प्रमुखने मंगळवारी सायंकाळी पंचायतची बैठक घेऊन हा आदेश दिला होता. 

दरम्यान, बोकारोचे पोलीस अधिक्षक जितेंद्र सिंग यांनी सांगितले, आरोपी आणि भोपाल यांना मुलीच्या जबानीनंतर अटक केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, July 12, 2014 - 16:31
comments powered by Disqus